शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा

उद्धव ठाकरे ठाण्यात 'उत्तर भारतीय मेळावा घेणार' आहेत.
Published by :
Team Lokshahi

ठाणे: उद्धव ठाकरे 22 जुलैला ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असताना दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे आणि विभागावार बैठकांना सुद्धा सुरुवात केली आहे.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी अशाच प्रकारे उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात हा मेळावा घेण्याचे नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आता मुंबई ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन मराठी मतदारांसोबत उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com