Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा, शिंदेंना घेरण्यासाठी सज्ज

पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा संपर्क वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात उतरणार

शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे सर्वात मोठी बंडखोरी झाली. त्यामुळे सेनेत दोन गट पडल. शिवसेना नक्की कोणाची वाद कोर्टात असताना शिंदे गट आणि शिवसेनेत दसरा मेळाव्यावरून वाद शेंगेला पोहचला आहे. दरम्यान आता दसरा मेळाव्यावर दोन्ही गटात रस्सीखेच सुरू असताना. या मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उद्या गट प्रमुखांसाठीचा मेळावा आयोजित केला आहे.

Uddhav Thackeray
परवानगी मिळाली नसली तरी शिवतीर्थावर पहिला हक्क आमचा - शंभूराज देसाई

शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा कोण घेणार याबाबात संभ्रम आहे. शिंदे गटाला आधी अर्ज केल्याने एमएमआरडीएने बीकेसी मैदानावर मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु ठाकरे गटला अद्याप परवागनी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
चित्ता आणि पेंग्विनवरून अजित पवार,बावनकुळेंमध्ये जुंपली

दरम्यान, दसरा मेळाव्याआधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ठाकरी तोफ धडाडणार आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहे. उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात हा मेळावा घेणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com