यांच्याकडे खोके द्यायला पैसे आहेत, अंगणवाडी सेविकांना द्यायला नाहीत? उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

यांच्याकडे खोके द्यायला पैसे आहेत, अंगणवाडी सेविकांना द्यायला नाहीत? उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

उध्दव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला. उध्दव ठाकरेंनी आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरादार हल्लाबोल केला.
Published on

मुंबई : मी आज नेता म्हणून नाही तर तुमचा भाऊ म्हणून आलो आहे, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला. उध्दव ठाकरेंनी आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरादार हल्लाबोल केला.

यांच्याकडे खोके द्यायला पैसे आहेत, अंगणवाडी सेविकांना द्यायला नाहीत? उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल
काँग्रेसने मोठा भाऊ असण्याचा ॲटीट्युड जपण्यापेक्षा...; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आज नेता म्हणून नाही तर तुमचा भाऊ म्हणून आलो आहे. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. तुम्ही सावित्री बाईंच्या लेकी आहेत आणि ही क्रांती मशाल कोणाचीही सत्ता असो जाळून टाकतील. सेवा करणारे हात एकमेकांवर आपटले तर एवढा आवाज येतो. सरकारच्या कानाखाली पडले तर किती आवाज होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

मी आज मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री असताना मी काही दिले नाही. पण, तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि तुमच्यामुळे तेव्हाचे सरकार चांगले काम करू शकले. आणि ते म्हणतात कि हे अधिवेशन झालं कि करतो पण पुढील अधिवेशनात तुम्ही टिकताल का, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. कोरोनाचे संकट टळले आणि मी आजारी पडलो आणि नंतर गद्दारांनी सरकार पाडले. पण आज आपलं सरकार असत तर तुम्हाला आंदोलनाची ही वेळ आली नसती, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, भारत सुदृढ करण्याचे काम खरं तुम्ही करता. भारत घडवणारी खरी ताकद ही तुम्ही आहात. यांच्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. जाहिराती करायला पैसे आहेत, असा निशाणाही सरकारवर साधला आहे.

मध्यप्रदेशमध्ये जिंकले त्यांनाच कसे कळले नाही कि कसे जिंकले? पण तिथे लाडली योजना होती. तुम्ही लाडली नाहीत का?? आणि तुमच्या हातून श्री गणेशा शिकतो. तुमच्या पाठी नाही तर तुमच्या सोबत लढायचे आहे. तुमचे हक्क मिळेपर्यंत लढायचे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही युतीत होतो. आणि तेव्हा मी म्हणालो होतो कि तुमच्या केसाला धक्का लागला तर मी सरकार पाडेन, असेही उध्दव ठाकरेंनी सांगितले आहे.

दरम्यान, राम मंदिराबाबतही उध्दव ठाकरेंनी भाष्य केले आहे. आता राम मंदिर होतंय, तुम्ही राम भक्त नाहीत का? राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खाजगी प्रॉपर्टी नाही. मी स्वतः राम मंदिरात जाणार आहे. मला कोणाच्या आमंत्रणाची गरज नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा जाईन, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com