Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

दोन महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होऊ शकतात : उध्दव ठाकरे

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा निर्णय एकनाथ शिंदेंचा मोठा विजय मानण्यात येत आहे.

मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा निर्णय एकनाथ शिंदेंचा मोठा विजय मानण्यात येत आहे. अशातच, आता महापालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक घोषित होण्याची शक्यता उध्दव ठाकरे यांनी शक्यता वर्तवली आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायचे काही त्यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न धनुष्यबाण त्यांना देऊन साकार करतील, असा घणाघातही त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केला आहे.

Uddhav Thackeray
नामर्द..रावण..कौरव..बाजारबुणगे; उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

चोरांना राजमान्याता देणे हे काही जणांना घोषणावह वाटत असेल. पण, शेवटी चोर हा चोरच असतो. आज जी दयनीय अवस्था मिंदे गटाची आणि त्यांना मांडीवर घेतलेल्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाची झाली आहे. त्यांना स्वतः लढण्याची हिंमत नाही. मी अनेक वेळा आव्हान दिलयं हिंमत असेल तर निवडणूका घ्या. लोकसभेपासून महापालिका एकत्र घ्या. ती निवडणूक घेण्याची त्यांची हिंमत झालेली नाही.

ज्याप्रमाणे त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण हे मिंधे गटाला दिलेले आहे म्हणजेत कदाचित दोन महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होऊ शकतात. कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे. मुंबई महापालिकेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे. हे त्यांचे स्वप्न असून ते स्वप्न धनुष्यबाण त्यांना देऊन साकार करण्याचा प्रयत्न ते करतील. कदाचित आमचे मशाल चिन्हही घेतील. परंतु, मशाल आता पेटलेली आहे. तुम्ही अन्याय यंत्रणेचा वापर करुन तुम्ही आमच्यावर कराल. त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

गेले दिवस काही लोक केंद्रीय मंत्री सांगितले होते धनुष्यबाण यांनाचा मिळणार म्हणजे हा काय कट होता का? म्हणजेच यामध्ये किती मोठ्या पातळीवरची लोक सामील झाली आहेत. कारण उपमुख्यमंत्री सुध्दा धनुष्यबाण शिंदेंनाच मिळणार म्हणाले होते. आज धनुष्यबाण त्यांनाच मिळाले. धनुष्यबाण असे ओरबडून घेतले तरी तुम्हाला मिळाणार नाही कारण हे बाळासाहेबांच्या पुजेतील धनुष्यबाण आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com