'मोदींच्या कुटुंबात फक्त ते आणि त्यांची खुर्ची' - उद्धव ठाकरे

'मोदींच्या कुटुंबात फक्त ते आणि त्यांची खुर्ची' - उद्धव ठाकरे

पालघरमधून उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. त्या सभेत मोदींच्या नकली सेनेवरील टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पालघरमधून उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. त्या सभेत मोदींच्या नकली सेनेवरील टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'रिश्ते है ठिक है लेकीन रिश्ता कौन निभायेगा. रिश्ता है तो रिश्ता निभाओ'. नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही, मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची फक्त 2 जण आहेत दुसरे परिवार कोणीच नाही आहे. आणि आज हे इथे सगळे जमलेले आहेत असं समझा ही जनसुनावणी आहे मला सांगा किती जणांना वाढवण हवी आणि किती जणांना नको आहे. मी तुम्हाला एक वचन देतो, भारती ताई लोकसभेत जाणार आणि वाढवण बंदराचा फडशा पाडणार. रणगाडे आणूनही वाढवण बंदराचं काम करतील. गद्दार आणि त्याचे मालक राज्यात फिरत आहेत. परवा मी परिषद घेतली त्यात मी बोललो की या पुढे मी जी टीका करेन ती देशाच्या पंतप्रधानांवर नसेल तर नरेंद्र मोदींवर असेल, कारण देशाच्या पंतप्रधानचा मी कधी अपमान करणार नाही, करु शकणार नाही आणि करु इच्छित नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या बाहेरचे तुम्ही, तुमचा राज्याशी संबंध काय आहे? शिवसेना नकली असायला ती तुमची डिग्री आहे का? 'जो यांना देईल साथ हे त्यांचा करणार घात' ही यांची ब्रीद वाक्य आहे. गेल्या 19 च्या निवडणूकीमध्ये आपण म्हणालात की पालघरने चमत्कार केला, पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती. आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता. मग तुम्हीच विचार केला मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी जी शिवसेना यांच्यासोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संपवायला जे निघतात ते पालघरकरांना काय न्याय देऊ शकतील. महाराष्ट्राबाहेरुन येऊन तुम्ही आम्हाला नकली म्हणता? असे पालघरच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदीजी तुम्ही समोर या आणि दहा वर्षात काय केलं ते सांगा. माझ्यावर टीका केल्याशिवाय मोदींचं भाषण पूर्ण होत नाही. चीन भारतात आलं तरी चालेल पण ठाकरेंना संपवा ही मोदींची नीती आहे. मोदीजी तुमचं नाव पाटीवर लावू शकतात देशावर नाही. देशाच्या सरकारवर पुन्हा मोदींचं नाव येता कामा नये. अबकी बार भाजप तडीपार. माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करतात. खिचडी घोटाळा करताना अमोल किर्तीकरांवर खोटे आरोप केले. 70 हजार कोटींचा आरोप असेल तर उपमुख्यमंत्री करतात. भ्रष्टाचारी तितुका मेळावा भ्रष्टाचाऱ्यांसोबत घेतात. जितका मोठा भ्रष्टाचार तितकी मोठी पदं देतात. महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालणार नाही, ठाकरेंचंच चालणार. मोदींचं नाणं चालत नाही म्हणून शिवसेना फोडली. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com