पंतप्रधानांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : उद्धव ठाकरे

पंतप्रधानांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये दाखल झाले असून प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. यावर उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये दाखल झाले असून प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. यावर उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधानांकडे मराठा आरक्षणासाठी मागणी केली आहे. पंतप्रधान महाराष्ट्रात आले आहेत, त्यांचे स्वागत आहे. त्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही विनंती, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

पंतप्रधानांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : उद्धव ठाकरे
आरोपी अविनाश भोसलेंचा जेलऐवजी 10 महिने हॉस्पिटलमध्ये मुक्काम

मराठा आरक्षणावर बोललो आहे. खूप त्यावर बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने बोलून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. धनगर, आदिवासी यांना सगळ्याला विश्वास घेऊन निर्णय घ्यावा. लोकसभेत विशेष अधिवेशन घेऊन या सगळ्यांचा सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री यांनी शपथ घ्यावी, पण पर्याय सुद्धा सांगावा, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आले असून त्यांचं स्वागत आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही विनंती आहे, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींबद्दल खंत व्यक्त केली होती. आम्ही नरेंद्र मोदी यांना विनंतीची हाक दिली, आम्ही 5 ते 6 दिवस हाक दिली. मात्र, त्यांना (मोदींना) गरीबांचे घेणे-देणे नाही. मात्र त्यांनी राज्य सरकारला पंतप्रधानांनी कॉलही केला नाही. मोदींना वेळ नसेल, त्यांना गरिबांची गरज नसेल, अशी टीका त्यांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com