उद्धव ठाकरे विधानपरिषदेच्या आमदारपदी कायम? राजीनाम्याबाबत गूढ वाढलं

उद्धव ठाकरे विधानपरिषदेच्या आमदारपदी कायम? राजीनाम्याबाबत गूढ वाढलं

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले होते. अखेर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद व आमदाराकीचा राजीनामा दिला होता

मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले होते. अखेर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद व आमदाराकीचा राजीनामा दिला. मात्र, उद्धव ठाकरे अद्यपही विधानपरिषदेच्या आमदार पदी कायम असल्यांचे सांगितले जाते आहे. विधीमंडळाच्या वेबसाईटवरील आमदारांच्या यादीत उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अभूतपुर्व बंडानंतर उध्दव ठाकरेंनी २९ जून रोजी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. याचवेळी त्यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलेलं होतं. यामुळे सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला होता. परंतु, उद्धव ठाकरे विधानपरिषदेच्या आमदार पदी कायम असल्याचे सांगितले जात आहे. विधिमंडळाच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे हे अजूनही आमदार असल्याचं दिसत आहे.

विशेष म्हणजे ही यादी विधिमंडळाच्या वेबसाईटवरही असून त्यात शिवसेनेच्या विधान परिषदेतील १२ आमदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही समावेश आहे. जुलै 2022मध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत उद्धव ठाकरेंचं नावासह 13 मे 2026 पर्यंत आमदार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जरी दिला असला, तरी त्यांनी अद्याप विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा खरंच दिला आहे की नाही? यावर सस्पेंस वाढला आहे. आमदार पदाचा राजीनामा जर दिला नसेल विधीमंडळ अधिवेशनात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com