Chhagan Bhujbal & Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal & Uddhav ThackerayTeam Lokshahi

"... तर मी तेव्हाच भुजबळांना कामाला लावलं असतं" उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत बोलताना उद्धव ठाकरेंची फटकेबाजी.
Published by :
Vikrant Shinde

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व एकेकाळी शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले छगन भुजबळ यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसादिवशी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अनेक दिग्गजांसमोर बोलताना छगन भुजबळ यांचं कौतुक करताना टोलेबाजीही केली आहे.

Chhagan Bhujbal & Uddhav Thackeray
महात्मा गांधींचे पणतू उद्धव ठाकरेंसोबत! मनिषा कायंदेंनी केलं ट्वीट...

बोलताना राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना "भुजबळ साहेब सरकार वाचवण्याच इतके मातब्बर आहेत हे जर मला आधी ठाऊक असतं तर, मी तेव्हाच भुजबळांना कामाला लावलं असतं" असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती:

या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील व राजेश टोपे या राजकीय व्यक्तीमत्त्वांसह साहित्य क्षेत्रात ठसा उमटवलेले जावेद अख्तर हेही मंचावर उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com