Akola
AkolaTeam Lokshahi

शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दसरा मेळाव्यावरून अस्वस्थता; दिवाकर रावतेंची चुप्पी

Published by :
Sagar Pradhan

अमोल नांदूरकर|अकोला: दसरा मेळाव्यासाठी राज्यभरात शिवसेनेच्या सर्वच नेत्यांची प्रत्येक जिल्ह्यात गाठीभेटी सुरू आहे. त्यादरम्यान, ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. मात्र, अकोल्यात आलेले सेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे आज त्यानिमित्ताने आले असता त्यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रसारमाध्यमांशी ही त्यांनी संवाद न साधता चुप्पी साधली. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवाकर रावतेंची ही भूमिका संशयास्पद दिसते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई येथील शिवतीर्थावर शिवसेनेला दसरा मेळावा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा मेळावा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सेनेचे सर्व नेते प्रत्येक जिल्ह्यात सैनिकांच्या बैठका घेऊन नियोजन करीत आहे. अकोल्यातही बैठकीसाठी सेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते हे अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आले. तिथे त्यांनी काही कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत मात्र अश्वस्थ दिसत होते. त्यानंतर ते बाहेर जाण्यास निघाल्यानंतर पत्रकार त्यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता त्यांनी पत्रकरांशी संवाद साधणे तर दूरच त्यांच्याकडे पाहण्याची ही तसदी घेतली नाही. त्या ठिकाणाहून ते काही न बोलता निघून गेले.

नाही तेव्हा पत्रकारांशी संवाद

संवाद साधण्याची वाट पाहणारे रावते आज शांत होते. पक्षांतरांचे विचार तर त्यांच्या मनात येत नसतील ना, असा प्रश्न यावेळी शिवसैनिकांसह पत्रकारांमध्ये उपस्थित झाला. त्यामुळे रावते यांची ही कृती पक्षसंघटनाऐवजी वेगळीच असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com