दीपक केसरकरांना ठाकरे गटाकडून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; बॅनरची रंगली चर्चा
प्रसाद पाताडे|सिंधुदुर्ग: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अनोखा बॅनर लावून या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
कुडाळ तालुक्यातील उबाठा गटाचे कार्यकर्ते युवा सेनेचे पदाधिकारी योगेश धुरी यांनी या हटके शुभेच्छा दीपक केसरकर यांना दिल्या आहेत. या हटके शुभेच्छांचा बॅनर कुडाळ बाजारपेठेतील भर मुख्य चौकात लावल्याने बघ्यांची गर्दी जमली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागात तब्बल 1159 एवढी शिक्षक पदे रिक्त रिक्त आहेत. यावर सुशिक्षित डीएड बेरोजगार संघटना असतील. उबाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आंदोलने करत आले आहेत. तर त्वरित शिक्षक भरती करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यातच उद्या दीपक केसरकर यांचा वाढदिवस असल्याने माणगाव येथील युवासेना पदाधिकारी असलेले योगेश धुरी यांनी कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर एक अनोखा बॅनर लावून शुभेच्छा दिल्या आहेत.
'डीएडच्या बेरोजगार उमेदवारांचे वाटोळ केल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' अशा आशयाचा बॅनर कुडाळ बाजारपेठेत लावण्यात आले आहेत. परंतु, नगरपंचायतीच्या निदर्शनास आल्याने हा बॅनर हटविण्यात आला. मात्र, या अजब शुभेच्छांमुळे या बॅनरची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगू लागली आहे.
