छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा

या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
काळाराम मंदिरात संयोगीताराजे यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावर संभाजीराजेंचं भाष्य; म्हणाले, मला अभिमान...

संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे ही सभा होणार की नाही याबाबत संभ्रम होता. परंतु, पोलिसांनी मविआला 15 अटी व शर्थीवर सभेची परवानगी दिली आहे. यात मविआने जाहीर सभा सायं. 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्यावी. वेळ आणि कार्यक्रमाच्या ठिकाणात कोणताही बदल करू नये. आक्षेपार्ह घोषणाबाजी, असभ्य वर्तन, हुल्लडबाजी होणार याची काळजी घ्यावी. सभेला जाताना किंवा येताना बाईक रॅली काढू नये.

कार्यक्रमाच्या वेळी कोणताही रस्ता रहदारीसाठी बंद करू नये. वाहतुकीला कोणाताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कार्यक्रमादरम्यान शस्त्र, तलवारी वापरू नये. सभेसाठी आलेल्या वाहनांनी पोलिसांकडून जारी केलेल्या मार्गानेच प्रवास करावा. सभेसाठी आवश्यक त्या शासकीय विभागाची परवानगी घ्यावी, अशा अटी-शर्थींवर परवानगी दिली आहे.

तर, छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची भव्य विराट सभा होत आहे आणि या सभेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. पंधरापेक्षाही जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती समोर आली असून या ठिकाणी झालेल्या वातावरणानंतर हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com