लोकसभा निवडणुकीच्या ३० जागांवर निर्णय होणार? 'या' दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या ३० जागांवर निर्णय होणार? 'या' दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक येत्या 26 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समजली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई | वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक येत्या 26 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समजली आहे. या बैठकीत अशी अपेक्षा आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील 30 लोकसभा जागांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणुक लढलेले आणि सध्या वंचित बहुजन आघाडीत सक्रिय असलेल्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभेच्या ३० जागांवर चर्चा करणार असून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने सातत्याने भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्र व्यवहार, जाहीरपणे सांगून एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे. परंतु, वंचितच्या प्रयत्नांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ‘वंचित’ला आता यावर भूमिका घ्यावी लागत आहे, असंही सुत्राने सांगितले आहे. वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून इंडिया आघाडीचा भाग बनण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु, कॉग्रेसकडून कुठलीही हालचाल होतांना दिसत नाही आहे.

वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. मागील 20 दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक 5 डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनिती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीने सभांचा धडाका लावून निवडणुकीत आघाडी घेतली हे. अकोला, धुळे, सटाणा, मुंबई येथील सभांना लाखोंच्या संख्येने जनतेकडून प्रतिसाद मिळतो आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com