Vijay Wadettiwar: पुण्यातील हिट अँड रन केस घटनेची न्यायिक चौकशी व्हावी; विजय वड्डेटीवार यांची मागणी

Vijay Wadettiwar: पुण्यातील हिट अँड रन केस घटनेची न्यायिक चौकशी व्हावी; विजय वड्डेटीवार यांची मागणी

पुण्यातील हिट अँड रन केस घटनेची न्यायिक चौकशी व्हावी अशी विजय वड्डेटीवार यांनी मागणी केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी एक घटना घडली होती. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ट्विट करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

विजय वड्डेटीवार पोस्ट शेअर करत म्हणाले की, दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी

पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी

पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे CCTV फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?

रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?

नियम डावलून बार आणि पब सुरू होते का?

होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही?

या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे.

आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला?

म्हणूनच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com