राजकारण
सरकारनं जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी; वडेट्टीवारांची टीका
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे. 2 दिवस ही बैठक चालणार असून या बैठकीसाठी पूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी कॅबिनेटच्या बैठका झाल्या. पण कुठलेही सरकार आणि त्यांचे मंत्री फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहिले नाही. या सरकारला जनाची नाहीतर मनाची लाज वाटत असेल. थोडातरी विचार करावा.
2014 मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये 49 हजार 800 कोटींचे पॅकेज घोषित केलं होते. त्या पॅकेजचं काय झालं? याचं उत्तर मराठवाड्यातली जनतेला पहिलं द्यावं. लोकांचे फसवणूक करण्याचे काम करु नये.