सप्टेंबर महिन्यात 'मुख्य' खुर्ची बदलणार; वडेट्टीवारांचा मोठा दावा

सप्टेंबर महिन्यात 'मुख्य' खुर्ची बदलणार; वडेट्टीवारांचा मोठा दावा

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विजय वडेट्टीवारांचा रोख नेमका कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

नागपूर : १५ ते २० दिवसांत राज्यात काय बदल होईल ते राज्य बघेल. सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून वडेट्टीवारांचा रोख नेमका कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.

सप्टेंबर महिन्यात 'मुख्य' खुर्ची बदलणार; वडेट्टीवारांचा मोठा दावा
फडणवीस, सांभाळा! ठाकरे गटाकडून घणाघात, दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध...

मुख्यमंत्री असतात तेव्हा कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. कधी नागपूरचे दांडी मारतात. तिघंही कधी एकत्र येत नाही. दोन उपमुख्यमंत्री असतात तेव्हा मुख्यमंत्री नसतात. मुख्यमंत्र्यांनी भोजनाचे आवतन दिले त्याला उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. यावरून राज्यात सर्व काही आलबेल सुरू आहे असं म्हणता येत नाही. याचा मुख्य खुर्चीला धोका आहे. सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून भाजप कॉंग्रेसवर टीका करत आहे. याचेही प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. कर्नाटकात तो पुतळा अनधिकृत होता. त्या पुतळ्याचा चेहरा आणि महाराजांचा चेहरा यात फरक होता. भाजपवाल्यांनी मुर्खासारखं बोलू नये. माहिती घेऊन बोलावं. यांच्या काळात किती पुतळे हटवले. तेव्हा का बोलले नाही? तेव्हा तोंड शिवलं होतं का? भाजप कधी महाराजांचे झाले का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com