Vijay Wadettiwar : लोकशाही मराठीवरील कारवाईनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.या निर्णयाचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निषेध केला असून प्रतिक्रिया दिली आहे.

लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयाचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निषेध केला असून प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे जे चाललंय हे माध्यमांचा आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे. कोणीही आमच्याविरुध्द मांडाल, बोलालं तर त्याला आम्ही सोडणार नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. हे कृत्य निश्चितच संविधानविरोधी आहे आणि लोकशाहीला घातक असा निर्णय केंद्र सरकारचा आहे, असे मला वाटतं. एकूणच माध्यमांची गळचेपी करण्यासाठी त्यांच्यावर धाक दाखवण्यासाठी आम्ही म्हणू ते दाखवा आमच्या विरुध्द दाखवाल तर खबरदार असा इशाराच या निर्णयाने दिला आहे. ही कारवाई अत्यंत खेदजनक आणि क्लेशदायक आहे. माध्यामांच्या स्वातंत्र्यांचे गळा घोटण्याचे पाप यानिमित्ताने होतो आहे. ही कारवाई म्हणजे देशातील लोकशाही संपविण्यासाठी उचलंल हे पाऊल आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com