Vijay Wadettiwar : इंडियाच्या बैठकीला घाबरून 'एक देश एक निवडणूक' प्रयत्न सुरू
एक देश एक निवडणुकासाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. 2016 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात एक देश एक निवडणुकांसदर्भात उल्लेख केला होता. एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वड्डेटीवार म्हणाले की, विरोधकांची एकजूट आणि या एकत्रित येण्याला ते घाबरले आहेत. म्हणून गॅस, पेट्रोलचे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये डिझेल ६० रूपयांवर येण्याची शक्यता आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, एक देश एक निवडणुकसाठी १२ राज्यातील मुख्यमंत्री विरोधक आहेत. अशा स्थितीत मोठा आकडा गाठणं भाजपला कठिण आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीमुळे केंद्रातील सरकार विचलीत झाली आहे. असे विजय वड्डेटीवार म्हणाले.