शेतकऱ्यांच्या डोळयातील पाणी पाहून चहापान...; वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

शेतकऱ्यांच्या डोळयातील पाणी पाहून चहापान...; वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षाची पत्रकार परिषद झाली. यावेळी विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीकास्त्र डागले.

नागपूर : अधिवेशनासाठी आज संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपूरमध्ये आले आहे. महाराष्ट्रामध्ये फोडून सरकार आले आहे. राज्यातील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या डोळयातील पाणी पाहून चहापान टाळता आलं असतं. चहापानावर आमचा बहिष्कार आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षाची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या डोळयातील पाणी पाहून चहापान...; वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र
आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, 31 तारखेपर्यंत...

विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज अधिवेशनासाठी संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपूरमध्ये आले आहे. महाराष्ट्रामध्ये फोडून सरकार आले आहे. सगळ्यात जास्त दंगली महाराष्ट्र झाल्या आहे. सगळ्यात जास्त दंगली आणि बलात्काराच्या घटना घडल्या, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालय यांनी दिली. नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. ज्या राज्यात सगळ्यात जास्त दंगली झालेलं राज्य आहे तिथे व्ययवसाय कसे येणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

22 हजार 146 शेतकऱ्यांनी या वर्षात आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रमधील शेतकरी उद्धवस्त झाला असताना यांना शासन आपल्या दारी हा इव्हेंट करत आहे. बीडमध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत आणि तिथे सरकारला कार्यक्रमाची जाहिरात करण्याची लाज वाटत नाही. हा अधिवेशनाचा कालावधी फार कमी आहे. या प्रश्नावर चर्चा होऊ नये म्हणून आमचा आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन 15 दिवस कामकाजाची असावे या सरकारने त्यातून पळ काढला आहे. त्यांना चर्चा करायची नाही असं मला त्या ठिकाणी दिसते, अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे.

थातुरमातुर मदत सरकारने केली आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली आहे. सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक नाही. हे सरकार कस टिकेल यासाठी सगळे प्रयत्न करत आहे आणि अशी स्थिती असताना या सरकारने केवळ पंचनामाच्या आदेश दिले असतील तरी सर्व पंचनामे व्हावे असे सांगितले नाही. सरसकट पंचनामे करण्यापासून सरकारने थांबवले, असा आरोप त्यांनी केला आहे.

आपल्या राजकारणासाठी केलेला आरक्षणाचा खेळखंडोबा या सरकारने केलेला आहे. दोन समाजात भांडण लावून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एकमेकांसमोर उभे करण्याचं काम केलं आहे. पक्ष फोडीपासून स्वतःचे बदनामी झाकण्यासाठी गेलेली प्रत सुधारण्यासाठी या सरकारने मराठे विरुद्ध ओबीसी धनगर विरुध्द आदिवासी अशा समाजात भांडण लावले. हे सगळे पक्ष एकमेकांच्या वर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. मंत्रिमंडळ विस्तार करण्याची ताकद या तिघांमध्ये नाही, असाही हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com