...अन्यथा नाईलाजाने मला राजीनामा द्यावा लागेल; निधीवरुन भाजप आमदाराचा फडणवीसांना इशारा

...अन्यथा नाईलाजाने मला राजीनामा द्यावा लागेल; निधीवरुन भाजप आमदाराचा फडणवीसांना इशारा

भाजप आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

भूपेश बारंगे | वर्धा : आर्वी मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे पत्र सध्या व्हायरल होत आहे. कारंजा शहरात मंजूर झालेल्या निधी रद्द करण्याची मागणी दादाराव केचे यांनी केली आहे. अन्यथा आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

...अन्यथा नाईलाजाने मला राजीनामा द्यावा लागेल; निधीवरुन भाजप आमदाराचा फडणवीसांना इशारा
...म्हणून कारवाई करताना मी लाथ मारली; 'त्या' व्हिडीओवर महापालिका अधिकाऱ्यांच स्पष्टीकरण

काय आहे दादाराव केचे यांचे पत्र?

आर्वी, आष्टी, कारंजा येथे 9.83 कोटी निधी मंजूर केला आहे. या मतदारसंघाचा मी आमदार या नात्याने माझ्या पत्रशिवाय हा निधी मंजूर केला गेला. त्यामुळे माझा हा अपमान आहे. हा अपमान मी सहन करू शकत नाही. तो निधी तात्काळ रद्द करून मी सुचवितो तिथे निधी द्या. अन्यथा नाईलाजाने मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असे दादाराव केचे यांनी फडणवीसांना पत्र लिहीले आहे.

आर्वी मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापत असल्याने भाजप पक्षातच हेवेदावे होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांची स्वीय सहाय्य सध्या आर्वी मतदार संघात येरझाऱ्या मारत असून अनेक निधी मंजूर केले जात असल्याने दादाराव केचे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसून येत आहे. यावरुन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत केचे यांचा पत्ता कट होण्याच्या चर्चा रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर दादाराव केचे आज फडणवीस यांची मुंबई भेट घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com