Pankaja Munde Dasara Melava: शिवशक्ती परिक्रमानंतर आज पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार?

Pankaja Munde Dasara Melava: शिवशक्ती परिक्रमानंतर आज पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार?

भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. याआधीच्या दसरा मेळाव्यात पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आता, मंगळवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात कोणत्या मुद्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

2019 विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधील एक गट कार्यरत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंकजा यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली.

सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या कोणत्या मुद्यावर भाष्य करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. पंकजा मुंडे आपल्या भाषणातून राजकीय आणि सामाजिक संदेश ही देणार असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले की, यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी लोकांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. लोकांनीच हा मेळावा हाती घेतल्याची परिस्थिती आहे. लोकांनी स्वत: हून मेळाव्याचा प्रचार सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले. शिवशक्ती परिक्रमा झाली आहे. राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले आहेत. अनेक दशकातील राजकीय बदल या मागील काही वर्षात झाले असल्याची टिप्पणी पंकजा मुंडे यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com