कोरोनात सण का बंद केले? शरद पवार म्हणाले, एक दिवस सकाळी उठून पंतप्रधानांनी...

कोरोनात सण का बंद केले? शरद पवार म्हणाले, एक दिवस सकाळी उठून पंतप्रधानांनी...

शरद पवारांचे पत्रकार परिषदेत भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर

मुंबई : कोरोना काळातील सणांवरुन शिंदे-फडणवीस सरकार सातत्याने महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. याला आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. सण का बंद केले. तर, देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपील केले होते. एक दिवस सकाळी उठून कोरोनाला तोंड द्यायची घोषणा केली होती, असे त्यांनी म्हंटले आहे.

राज्यात सध्या दसरा मेळव्यावरुन राजकारण तापले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे आहेत. दसरा मेळावा व शिवाजी पार्क यावरुन ह्यात वाद वाढवला नाही पाहिजे. त्यांना बीकेसीमध्ये जागा मिळाली आहे. यामुळे त्यांचा प्रश्न सुटला आहे. मग. परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांची मागणी मान्य करण्यास विलंब नाही केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना काळातील सणांवरुन शिंदे-फडणवीस सरकारने सातत्याने महाविकास आघाडीवर आरोप केले होते. याला आज शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, सण का बंद केले. तर, देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपील केले होते. एक दिवस सकाळी उठून कोरोनाला तोंड द्यायची घोषणा केली होती. राष्ट्रीय धोरण पंतप्रधानांनी मांडले त्याचाच राज्यानेही अवलंब केला. याची जाण महाराष्ट्र जाणकारांनी ठेवली पाहिजे, असा टोला पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

भाजपच्या मिशन बारामतीवर शरद पवार यांनी भाजप नेते अरुण जेटली हेही बारामती आले होते. तेव्हा ते माझ्या घरी राहिले होते. नरेंद्र मोदीही आले. पण, तेव्हा काय बोलले ते मी सांगणार नाही. येत आहे येऊ दे, असे म्हंटले आहे.

दरम्यान, शिंदे सरकार आल्यापासून नुसत्या घोषणा केल्या जातात. राज्य पहिल्यांदा हातात आले आहे. काही घोषणा करण्यात आनंद वाटत असेल. त्या घोषणा कोण लिहून देते व लिहून देणारे लोक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असा टोला शरद पवारांनी देवेंद फडणवीस यांना लगाविला आहे. ते आताच मुख्यमंत्री झाले. आता बाकीच्या गोष्टी सोडून प्रशासनकडे अधिक लक्ष देतील, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com