Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

कोरोना झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस राज्यसभेत मतदान करणार?

जाणून घ्या कसे होणार Devendra Fadnavis मतदानात सहभागी

मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणुकीसाठी अवघे पाचच दिवस शिल्लक असतानाच भाजपच्या मुख्य शिलेदारांपैकी एक म्हणजेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोना झाला आहे. यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. तरीही फडणवीस राजयसभेत मतदान करणार की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर चाचपणी करण्यासाठी भाजपने तातडीची बैठक बोलविली आहे.

Devendra Fadnavis
महाविकास आघाडीची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक, अपक्षही लावणार हजेरी

राज्यात राज्यसभानिवडणूक होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपनं (BJP) पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिघांना उमेदवारी दिली. शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सहाव्या जागेसाठी महाडिक आणि संजय पवार यांच्यात लढत होणार असल्याने एक-एक मत महत्वाचे आहे. या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला आहे. तर फडणवीसांना कोरोना होणे भाजपला महागात पडण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर देवेंद्र फडणवीस दोन्ही बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. राज्य प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार तर गिरीश महाजन, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय दुसऱ्या बैठकीत हजर राहणार आहेत.

Devendra Fadnavis
मास्क सक्तीबाबत सरकार आणि प्रशासनात गोंधळ; अजित पवार म्हणाले, मी स्पष्ट...

देवेंद्र फडणवीस मतदान करु शकणार की नाही, असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित राहिले आहेत. परंतु, राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या नियमांनुसार देवेंद्र फडणवीसांना तीन दिवस आयसोलेशन पाळावे लागणार आहे. तिसऱ्या दिवशी कोविड रिपोर्ट निगेटीव्ह आला तरच त्यांना घराबाहेर पडता येणार आहे. तसेच, निगेटीव्ह रिपोर्ट येईपर्यंत फडणवीसांना घरातच राहावे लागणार आहे. फडणवीसांचा अहवाल निगेटीव्ह आला नाही तर पोस्ट मतदानावरही विचार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या प्रत्येक मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडी स्पर्धा लागली असून उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदान करण्याची परवानगी मिळवी यासाठी न्यायालयात जाणार आहेत.

Devendra Fadnavis
काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करतात; संजय राऊतांचा खोचक सवाल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com