Pankaja Munde Devendra Fadnavis
Pankaja Munde Devendra Fadnavisteam lokshahi

फडणवीसांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडेंना स्थान मिळणार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं सरकार सोपं असेल का?

Pankaja Munde Devendra Fadnavis : शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. (Will Pankaja Munde get a place in Devendra Fadnavis's government)

Pankaja Munde Devendra Fadnavis
आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर कधीच होऊ देणार नाही; इम्तियाज जलील संतप्त

आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करतील अशीच शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही मोठं आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं सरकार सोपं असेल का? असा सवालही राजकीय वर्तुळातून विचारला जातो.

Pankaja Munde Devendra Fadnavis
उद्याच सत्ता स्थापनेचा दावा? देवेंद्र फडणवीस शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी?

तसेच, नव्या सरकारमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार नसल्यांच सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत. शिवाय त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डावललं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com