राज ठाकरे-उध्दव ठाकरे एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे संकेत

राज ठाकरे-उध्दव ठाकरे एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे संकेत

पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात राज-उध्दव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्याचे महत्वपूर्ण संकेत दिले आहेत.

मुंबई : उध्दव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खूप छान दिवस होते ते, असे म्हंटले आहे. 'खुपते तिथे गुप्ते'च्या प्रोमोमधील राज ठाकरे यांची ही क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात राज-उध्दव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत.

राज ठाकरे-उध्दव ठाकरे एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे संकेत
मोठी बातमी! आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी

कर्नाटकमध्ये जे घडलं आणि नोटबंदी यावर राज ठाकरे आधीच बोलले आहेत. त्यांचं मी मागे देखील अभिनंदन केला. मागच्या वेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी यांना उत्तर दिला होता. अशात, राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत राहिले तर नक्कीच आम्ही तसा प्रस्ताव ठेवू. त्यांची भूमिका व महाविकास आघाडीचे विचार सोबत सारखेच आहेत, असे वक्तव्य महेश तपासे यांनी केले आहे. तसा काही विचार निघाला नाही, असेही त्यांनी पुढे म्हंटले आहे. उद्या शरद पवार यांच्यासोबत अनेक पक्षातील नेत्यांची भेट आहे. उद्याच्या भेटीतून पुढच्या भूमिका ठरतील, अशीही माहिती तपासेंनी सांगितली आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरही महेश तपासेंनी भाष्य केले आहे. हे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाही आणि करायचा देखील नाही. जे शिवसेनेतून बाहेर पडले ते सगळे मंत्री पदासठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. सगळ्यांना मंत्री बनायचं आहे. पण भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर या ठिकाणी नक्कीच बाकीची मंत्री पद हे भाजपच्या आमदारांना देणं स्वाभाविक आहे. पण, ज्या दिवशी मंत्री मंडळाचा विस्तार होईल तेव्हापासून उलटी गितनी सुरु होईल. मंत्रिमंडळ विस्ताराला हे लोक घाबरत आहेत, अशी जोरदार टीकाही तपासेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com