Raj Thackeray: महायुतीच्या प्रचारसभेला जाणार का? राज ठाकरे म्हणाले...

Raj Thackeray: महायुतीच्या प्रचारसभेला जाणार का? राज ठाकरे म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे. त्याचे विश्लेषण मी त्यादिवशीच्या सभेमध्ये केलेलं आहे.

पहिल्या 5 वर्षातल्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याबाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला. अनेकवेळा लोक सांगतात की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. प्रश्न 2014च्या आधीची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटते की मला भूमिका बदलणं आवश्यक होते असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महायुतीच्या प्रचारसभेला जाणार का? यावर राज ठाकरे उत्तर देत म्हणाले की, मी अजून ठरवलेलं नाही की कुठे घ्यायच्या आणि काय घ्यायच्या. पुढे बघू. माझी चर्चा झाल्यावर मी सांगेन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com