Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Team Lokshahi

तुम्ही बॉडी दिली तर आधी तुम्ही माफी मागा, कबरीच्या मुद्यावरून जाधवांची भाजपवर टीका

याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप आणि शिवसेने दरम्यान वाद चिघळला
Published by :
Sagar Pradhan

आज एकीकडे मोठया जल्लोषात गणेश विसर्जन पार पडत आहे. मात्र, राजकीय गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मुंबई स्फोटांचा दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप आणि शिवसेनेदरम्यान चांगलाच वाद चिघळत चालला आहे. भाजपच्या नेत्यांनी फोटो ट्विट करून तत्कालीन मविआ सरकार कबरी बाबत सवाल विचारल्यानंतर आता शिवसेनेकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर येत आहे.

Bhaskar Jadhav
नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय? राज ठाकरेंची सूचक पोस्ट

कोकणातले शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हीच याकूब मेमनची बॉडी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी माफी मागण्यापेक्षा आधी भाजपनेच जनतेची माफी मागितली पाहिजे, असं विधान जाधवांनी केले.

पुढे ते बोलताना म्हणाले की, गणपती उत्सव सुरु असताना जनतेची डोकी भडकवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.ऐन, गणेशोत्सवात याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. यामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय, असा आरोप जाधव यांनी भाजपवर केला आहे.

Bhaskar Jadhav
कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

काल भाजपचे बरेच विद्वान लोकं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांना माफी मागायला सांगत होते. पण आता तुम्ही बॉडी दिली तर आधी तुम्ही माफी मागा, याकूब मेमनची कबर असलेली ती जागा खासगी आहे. सरकारी किंवा महापालिकेने तिथे एकही पैसा खर्च केलेला नाही. उद्धव ठाकरेंवर आरोप करणं चुकीचं आहे, असे वक्तव्य त्यांनी बोलताना केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com