लोकशाहीच्या विरोधातच सर्वकाही होतंय; यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.

मुंबई : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 लोकशाहीच्या विरोधातच सर्वकाही होतंय; यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया
'लोकशाही'ने सौमय्यांचे खरं रुप समोर आणलं; विद्या चव्हाणांचा घणाघात

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, माध्यमांच्या स्वातंत्र्यांवर हा आघात आहे. संविधानाच्या विरोधात यांना सर्वकाही करायचे आहे. लोकशाहीच्या विरोधात हे सर्व लोक आहेत. यांना लोकशाही नकोय तर हुकुमशाही पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी करत आहेत, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com