प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत यायला पाहिजे; कोण म्हणाले असं?

प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत यायला पाहिजे; कोण म्हणाले असं?

ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असली तरी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असली तरी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही. इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. यातच प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वंचित व काँग्रेसची विचारधारा एकच आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत व इंडिया आघाडीत देखील सहभागी झाले पाहिजे. अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. सर्व धर्म समभाव व संविधानाचे पाईक आम्ही व वंचित आहे. असंही ठाकूर यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com