गांधी घराण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची निष्ठा : नाना पटोले

गांधी घराण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची निष्ठा : नाना पटोले

काँग्रेस च्या अध्यक्ष पदासाठी अशोक गहिलोत हे अर्ज दाखल करणार आहेत.यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,काँग्रेस कार्यकर्त्यांची गांधी घराण्यावर निष्ठा आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गोपाळ व्यास, वाशीम

काँग्रेस च्या अध्यक्ष पदासाठी अशोक गहिलोत हे अर्ज दाखल करणार आहेत.यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,काँग्रेस कार्यकर्त्यांची गांधी घराण्यावर निष्ठा आहे.मात्र राहुल गांधी यांनी काँग्रेस चे अध्यक्ष पद घेण्यास नकार दिल्याने अशोक गहिलोत हे अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करत आहेत.या अगोदर ही गांधी घराण्या शिवाय इतर काँग्रेसी अध्यक्ष बनल्याचे नाना पटोले यांनी सांगितलंय. ते शिरपूर इथं आले असता बोलत होते.

खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसल्यावरून प्रश्न विचारला असता, ती खुर्ची त्यांच्या घरची असून, ती मंत्रालयातील खुर्ची नाही त्यामुळं त्यावर सुप्रिया सुळे त्यांच्या घरी जाऊन तर त्या खुर्चीवर बसणार का असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

भाजप प्रणित ईडीच सरकार कायदा सुव्यवस्था खराब करीत आहे.त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकालाच आम्ही स्वागत करतो,ही नाना पटोले यांनी बोलताना सांगितलय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com