LSG vs GT : गुजरातचा विजयरथ रोखून लखनौने मैदानं मारलं
आयपीएल 2025 च्या 26 मॅचमध्ये गुजरात आणि लखनौ यांच्यात सामना रंगला. शनिवारी होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये पहिला सामना गुजरात आणि लखनौ यांच्यात झाला असून सामन्यात लखनौने गुजरातवर ६ गडी राखून विजय मिळवला. गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 180 धावा केल्या. लखनौकडून एडन मारक्रम आणि निकोलस पूरनसह रिषभ पंत आणि बदोनीनं चांगली फलंदाजी केली. बदोनीनं लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं, त्यानं 28 धावा केल्या. आजच्या पराभवामुळं गुजरातचा विजयरथ रोखला असून गुजरात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरलं.
लखनौच्या एडन मारक्रम आणि निकोलस पूरन या दोघांनी अर्थशतकं झळकवली. एडन मारक्रम यानं 9 चौकार आणि 1 षटकार मारत 58 धावांची खेळी केली. निकोलस पूरन यानं फलंदाजीला येताच आक्रमक रुप धारण केलं. पूरन यानं षटकार मारण्यावर लक्ष केंद्रीत केलं. पूरननं 7 षटकार आणि 1 चौकार मारत 61 धावा केल्या. पूरनला राशिद खान यानं बाद केलं. लखनौकडून दिग्वेश सिंह यानं 4 ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. शार्दूल ठाकूरनं 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, रवि बिश्नोईनं 4 ओव्हरमध्ये 36 धावा देत 2 विकेट घेतल्या. आवेश खाननं 1 विकेट घेतली.