LSG vs KKR : लखनऊचा कोलकातावर 4 धावांनी विजय
आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात केकेआरने केवळ 4 धावांनी सामना गमावला, तर एलएसजीने विजय मिळवला. शेवटपर्यंत रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करत 3 बाद 238 धावा केल्या होत्या. मात्र केकेआरला विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. केकेआरने अखेरच्या षटकापर्यंत 7 गडी गमावून 234 धावा केल्या.
शेवटच्या षटकांत कोलकात्याला विजयासाठी 24 धावा हव्या होत्या. विकेटवर रिंकु सिंह आणि हर्षित राणा होते. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. शेवटच्या षटकांत कोलकात्याला विजयासाठी 24 धावा हव्या होत्या. विकेटवर रिंकु सिंह आणि हर्षित राणा होते. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. केकेआरने आयपीएलच्या हंगामातील हा पाचवा सामना खेळला असून आतापर्यंत 2 सामन्यात विजय मिळवला असून 3 सामने गमावले आहेत. तर एलएसजीने नेमकं उलट 2 सामने गमावले असून 3 सामन्यात विजय पटकावला आहे. आजच्या विजयासह एलएसजी चौथ्या क्रमांकावर आला आहे.