Lunar Eclipse 2025
Lunar Eclipse 2025

Lunar Eclipse 2025 : भारतात आज दिसणार खग्रास चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहण इतर देशांमध्येही दिसणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

भारतात आज दिसणार खग्रास चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहण इतर देशांमध्येही दिसणार

रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल

(Lunar Eclipse 2025) भारतामध्ये आज खगोल अभ्यासक आणि विज्ञान प्रेमींना खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. या दिवशी रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार असून आकाशात 'ब्लड मून' किंवा 'रेड मून' दिसणार आहे.

रात्री 9 वाजता ग्रहणाची सुरुवात होईल. त्यानंतर 9.57 वाजता खंडग्रास ग्रहण सुरू होईल. रात्री 11 वाजता खग्रास ग्रहणाचा टप्पा सुरू होईल आणि तो 12.23 वाजेपर्यंत पाहता येईल. या दरम्यान चंद्र लालसर दिसेल, ज्याला ब्लड मून असे म्हणतात. उत्तररात्री 1 वाजून 27 मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल हे खग्रास चंद्रग्रहण सर्वांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.

हे चंद्रग्रहण अभ्यासक आणि सामान्य लोकांसाठी मोठी संधी ठरणार आहे. आकाश निरभ्र आणि ढगाळ नसेल तर देशातील बहुतांश भागांतून हे ग्रहण स्पष्ट पाहता येईल. यंदाचे शेवटचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, ते भारतातून दिसणार नाही. हे खग्रास चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, आफ्रिका, यूरोप, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथूनही दिसेल.७ सप्टेंबरला होणारे हे खग्रास चंद्रग्रहण विज्ञानप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com