रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सभात्याग; अजित पवार संतापले

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सभात्याग; अजित पवार संतापले

फोन टॅपिंग प्रकरणावरून विधानसभेतून विरोधी पक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

फोन टॅपिंग प्रकरणावरून विधानसभेतून विरोधी पक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानसभेत अजित पवार, नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांचा मुद्दा उपस्थित केला आहे. रश्मी शुक्ला कोणाच्या नावाखाली फोन टॅप करायच्या , त्यांना पाठिशी का घातलं जातंय. असा सवाल विचारण्यात येत आहे. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार येताच राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली होती. विधानसभेत विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी देत प्रश्नोत्तरांऐवजी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र ही मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य न केल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे.

या सरकारने विरोधकांचे फोन टॅपिंग करून सरकार पडण्याचे, ब्लॅकमेलिंग करण्याचे काम केले, अशा परिस्थितीतही सरकार रश्मी शुक्लांना पाठीशी घातलं आहेत. रश्मी शुक्लांचा क्लोजर रिपोर्ट सरकारने घाईगडबडीने हायकोर्टाला पाठवला होता. माझ्यासह राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप झाले. या फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हे दाखल झाले. त्याच्या माध्यमातून जस सरकार महाराष्ट्रातील नाकाखालून बदलंल. नवं सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी रश्मी शुक्लांविरोधातील गुन्हा रद्द केले आणि क्लोजर रिपोर्ट हायकोर्टात पाठवला. यावेळी हायकोर्टानेही एवढी घाई कशाची? बिना चौकशी रिपोर्ट पाठवले का? असे नाना पटोलेंकडून विचारण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com