Breaking News
Breaking NewsTema Lokshahi

Maharashtra Breaking News Live : राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल!

मुंबई शहर उपनगरात त्याचबरोबर पश्चिम उपनगरात व पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडत असून नवी मुंबई देखील जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी जाणून घ्या...

राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल! 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं महत्वाच्या सूचना केल्या आहेत. जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निडणुकीत ओबीसींचे आरक्षण पुर्नस्थापित होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज अंतीम सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्याात आली आहे.

नाशिकचं सप्तश्रुंगी देवीचं मंदिर दीड महिना बंद राहणार, २१ जुलै ते ५ सप्टेंबर या दरम्यान मंदिर भाविकांसाठी बंद

पावसाचा जोर कायम, नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे 

गेले तीन दिवस पुन्हा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत असल्याने संभाव्य महापुराचा धोका वाढत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीकडे ३३ फुटावर पोहोचली आहे. पाणी ३९ फुटावर पोहोचताच इशारा पातळी गाठते. यामुळे जिल्हा भीतीच्या छायेत आहे.

मुंबईत दर्याला उधाण; समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी; महापालिकेच्या सूचना 

मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनानं हे आवाहन मुंबईकरांना केलं आहे.

खासदार सुजय विखे यांना करोनाची लागण

नगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ करोना चाचणी करून घ्यावी.

मुंबईच्या मुलुंड परिसरात एका ३३ वर्षीय व्यक्तीवरअनैसर्गिक अत्याचार

मुंबईच्या मुलुंड परिसरात एका ३३ वर्षीय व्यक्तीवरअनैसर्गिक अत्याचार गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना समोर

कांजूरमार्गला एकाच मार्गिकेचं कारशेड होऊ शकत, एमएमआरडीएची माहिती : किरीट सोमय्या

मेट्रो कारशेड प्रकल्पाबाबत एमएमआरडीएकडून कागद पत्र आली आहेत .आरे मधून कारशेड काढून कांजूरमार्गमध्ये होऊ शकत नाही ..अशी माहिती आली आहे. मागील महाराष्ट्र सरकारने दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला..तीन कारशेड भ्रम दूर करा आरे कारशेड लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावाई करावी, सोमय्यांची मागणी10 हजार कोटी वाढीव रक्कम झाली आहे,

राष्ट्रपतीपद निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पांठिंबा देणार असल्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

मनसेचा उद्याचा मेळावा लांबणीवर, राज ठाकरेंचं पत्र

मासेमारी साठी समुद्रात गेलेल्या दोन मच्छीमारांचा दुर्दैवी मृत्यू 

पालघर : जिल्ह्यात मुसळधार पाऊस असताना मासेमारी साठी समुद्रात गेलेल्या दोन मच्छीमारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पालघर मध्ये समोर आली आहे . डहाणूतील बहाड येथील गोपाळ मडवे आणि वसंत राऊत हे काल मासेमारीसाठी समुद्रात गेले होते . मात्र दोघेही घरी परत न असल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली . अखेर आज पहाटे म्हणजे 12 तासानंतर या दोन्ही मच्छीमारांचे मृतदेह समुद्र किनारी आढळून आले आहेत . काल पालघर मध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे सुरू होते याच वादळाच्या तडाख्यात आल्याने दोन्ही मच्छीमारांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय .

दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, दादर, माहिम, परळ आणि भायखळा येथे जोरदार पाऊस

12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यावर ताशी 45-55 कि.मी ते 65 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. याबरोबरच 12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत रत्नागिरीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

ओबीसी आरक्षण प्रश्नी (OBC Reservation)आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एकूण आरक्षणासाठी 50 टक्क्यांची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अनुसूचित जाती, जमाती किंवा आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिक आहे, बांठिया आयोगाने महापालिका, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रनिहाय मतदार यादीतील मतदारांच्या आडनावांवरून ओबीसींची संख्या निश्चित केली आहे.

विद्यार्थ्यांच्या व्हॅनवर वीज खांब पडला; सगळे सुखरूप बचावले

रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावर नाणिज मार्गावर सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. या मार्गावर वीज वाहिनीवर दोन झाडे उन्मळून पडल्याने विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एका खाजगी वाहनाच्या (एम एच ०८ ए पी १२८६) बोनेटवर वीज खांब पडल्याची अपघात घडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com