Jitendra Awhad : हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवनात; म्हणाले...

Jitendra Awhad : हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधानभवनात; म्हणाले...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. कोकाटे, मुंडेंच्या राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आज हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झालेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जात आहे. ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन आवाज बंद केला जात आहे. ती पद्धत चुकीची आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आमचा संविधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होता आलेच पाहिजे. या बेड्या यासाठी पण आहेत की, अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत. तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगत आहेत ते या बेड्यांपेक्षा कमी नाहीत. म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com