सर्वात मोठी बातमी : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

सर्वात मोठी बातमी : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सव काळात होणार अशी चर्चा होती. मात्र तेव्हा यासाठी मुहूर्त लागला नाही. मात्र सरकारकडून पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली.
Published by :
shweta walge

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सव काळात होणार अशी चर्चा होती. मात्र तेव्हा यासाठी मुहूर्त लागला नाही. मात्र सरकारकडून पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली. हिच यादी जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

15 किंवा 16 ऑक्टोबर किंवा नवरात्र उत्सवादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. विस्तारासाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत श्रेष्ठींची भेट घेतल्यावर तेथूनही हिरवा कंदिल दाखवण्यात आलाय.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार आणि कोणाला मंत्रीपद मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महायुती सरकारमध्ये सध्या भाजपचे 10 शिवसेना शिंदे गट 10 आणि नव्याने आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आणखीन 14 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर त्यात भाजपला 8 मंत्रीपदे हवी आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी प्रत्येकी 4 मंत्रिपदे मिळावीत यासाठी आग्रही आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com