Coronavirus : कोरोनाचा पुन्हा धोका; विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ
Admin

Coronavirus : कोरोनाचा पुन्हा धोका; विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ

कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. विषाणूच्या रुग्णामध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या काळात मृत्यूची नोंद 19 वरून 29 झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांत देशात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी समोर आलेल्या कोरोना विषाणूची प्रकरणे गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरनंतर देशात सर्वाधिक होती, तेव्हा 1,988 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

शनिवारी कोरोना विषाणूचे 1890 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली, जी गेल्या 210 दिवसांमधील प्रमाणात सर्वाधिक आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असलेली पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com