बांधकाम कामगारांच्या दृष्टीने सरकारचे महत्त्वाचे पाऊल, कामगार मंत्र्यांची मोठी घोषणा
बांधकाम कामगारांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. बांधकाम कामगारांना आता वयाच्या 60 व्या वर्षानंतरही निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा श्रमविभाग आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे. कामगार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाकडे नोंदणीकृत आसणाऱ्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे.
आकाश फुंडकरांची घोषणा :
विधानसभेच्या सभागृहात आकाश फुंडकर यांनी विधानसभेमध्ये म्हणाले की, "इमारत आणि इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हितासाठी केंद्र सरकारने 1996 साली कायदा लागू केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्याने 2007 साली 2007 साली नियम बनवले. या नियमा अंतर्गत 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबईची स्थापना करण्यात आली आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी करुन घेतली जाते. मात्र वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल".
"दरम्यान याबद्दल कायद्यातील तरतुदी आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार असून त्यानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. मंडळाकडे सध्या नोंदणी असणाऱ्या 58 लाख कामगारांच्या कुटुंबिय आणि यापुढे मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या कामगारांचे कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित होणार आहे".