'लव्ह-जिहाद'विरोधात फडणवीस सरकारची कठोर पावलं, 7 सदस्यीय समिती गठन; लवकरच कायदा करणार

लव्ह जिहाद फसवणुकीला बळी पडून धर्मांतर करू नये यासाठी राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने लव्ह जिहाद व जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या विरोधातील कायदे कठोर करण्याच्या निर्णयाकडे लक्ष दिले जात आहे. राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना बघायला मिळत आहे. या सगळ्या घटनांमुळे फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेकदा जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो.

हे धर्मांतर रोखण्यासाठी आता राज्यामध्ये कायदा लागू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची विशेष समिति गठित करण्यात आली आहे. ही समिती आता ही समिती राज्यातील लव्ह जिहाद प्रकरणातील अभ्यास करून कायद्याचा मसूदा तयार करणार आहेत.

याआधी देशात उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिसा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड या नऊ राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. आता महाराष्ट्रातहि लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी महाराष्ट्रातील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com