Ajit Pawar Death : महाराष्ट्रावर शोककळा; अजित पवार निधनानंतर आज सर्व शाळा आणि कार्यालये बंद

Ajit Pawar Death : महाराष्ट्रावर शोककळा; अजित पवार निधनानंतर आज सर्व शाळा आणि कार्यालये बंद

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. , महाराष्ट्र शासनाने या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आज २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात 'शासकीय सुट्टी' आणि 'राजकीय दुखवटा' जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे:

कार्यालये बंद: राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज पूर्णपणे बंद राहतील.

शिक्षण संस्थांना सुट्टी: सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ध्वज अर्ध्यावर: राष्ट्रध्वज राज्यातील सर्व सरकारी इमारतींवरील आज अर्ध्यावर उतरवलेले राहतील.

'शासकीय दुखवटा' म्हणजे काय? या काळात काय नियम असतात? जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या नेत्याचे किंवा पदाधिकाऱ्याचे निधन होते, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ सरकार 'राजकीय किंवा शासकीय दुखवटा' जाहीर करते. या काळात प्रोटोकॉलनुसार खालील गोष्टी पाळल्या जातात: १. राष्ट्रध्वज अर्ध्यावर : ज्या इमारतींवर दररोज राष्ट्रध्वज फडकवला जातो (उदा. मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानभवन), तिथे ध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. हे राष्ट्रीय शोकाचे प्रतीक मानले जाते. कार्यक्रम रद्द: शासनाकडून आयोजित केलेले आजचे सर्व करमणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. २. अधिकृत मनोरंजन कार्यक्रमांवर बंदी: या काळात सरकारतर्फे कोणताही उत्सव, सोहळा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जात नाही. कार्यक्रम जर असा आधीच ठरलेला असेल, तर तो रद्द केला जातो किंवा पुढे ढकलला जातो. ३. विदेशी पाहुण्यांचे स्वागत नाही: दुखवट्याच्या काळात सहसा कोणत्याही विदेशी मान्यवरांचे अधिकृत स्वागत किंवा मेजवानीचे कार्यक्रम टाळले जातात. ४. शासकीय अंत्यसंस्कार: 'राजकीय इतमामात' संबंधित नेत्यावर अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये पोलिसांच्या तुकडीतर्फे सलामी दिली जाते. ५. पुष्पहार अर्पण: महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये नेत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जाते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com