आमदार हसन मुश्रीफांवर कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी उगारली काठी
महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशनदेखील बेळगावात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाला शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने जाणार होते. मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. पण महाविकास आघाडीने आक्रमकता दाखवत बेळगावात जाण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावात जायला मविआचे नेते आणि कार्यकर्ते रवाना झाले आहेत. पोलिसांनी दडपशाही करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोगनोळी टोलनाक्याव रोखले.
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेते बेळगावच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी रोखल्यानंतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. हसन मुश्रीफ यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी थेट काठी उगारली पोलिसांनी थेट हसन मुश्रीफांवर काठी उगारल्याने सर्वच आक्रमक झाले आहेत.
माझ्या नजरेखाली असलेल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असताना मी अधिवेशनाला कसा जाऊ शकतो? आम्ही सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी महामेळाव्याला बेळगावमध्ये जात होतो. गेल्या 62 वर्षांपासून सीमाभागावर अन्याय होत असल्याने हा भाग केंद्रशासित केला पाहिजे, अशी मागणी आहे. असे हसन मुश्रीफ म्हणाले.