रेणुका देवीच्या यात्रेसाठी सौंदत्तीला गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलिसांची सुरक्षा
Admin

रेणुका देवीच्या यात्रेसाठी सौंदत्तीला गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलिसांची सुरक्षा

बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. यावर बसवराज बोम्माई यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.

कर्नाटकातील सौंदत्ती इथल्या रेणुका देवीच्या यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 9 डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या यात्रेसाठी जवळपास आठ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7 डिसेंबर म्हणजेच आज यात्रेचा मुख्य दिवस आहे.

या संदर्भातील ट्विटसुद्धा संभाजीराजे छत्रपती केलं आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल." असे त्यांनी ट्वीटद्वारे आवाहन केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com