Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रतस्करी प्रकरणात अटक, पंजाब पोलिसांची कारवाई
थोडक्यात
सिकंदर शेखसह चौघा जणांना अटक
उत्तर प्रदेशमधून शस्त्र आणून पंजाबमध्ये पुरविते
तस्करीचे रॅकेट कसे चालविले जात ?
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिंकदर शेखवर (Sikandar Shaikh) मोठी कारवाई झाली. शस्त्रतस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी त्याला अटक केलीय. पोलिस तपासात राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध आढळून आला आहे. या प्रकारामुळे कुस्तीक्षेत्रात खळबळ उडालीय.
सिकंदर शेखसह चौघा जणांना अटक
पंजाबा पोलिसांनी पापला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या सिकंदरशेखर चार शस्त्रतस्करांना अटक केलीय. या आरोपींकडून दोन लाख रुपयांची रोख रक्कम. एक 45 बोर पिस्तूल, चार 32 बोर पिस्तूल, काडतुसे आणि दोन स्कॉर्पिओ आणि एसयूव्ही जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या इतर आरोपींमध्ये दानवीर आणि बंटी हे दोघेही उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील छता गावातील रहिवासी आहे. तर कृष्णा उर्फ हॅपी गुज्जर हा नाडा नयागाव गावातील रहिवासी आहहे. सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा रहिवासी असून, मुल्लानपूर गरीबदास येथे राहतो. यांच्याविरुद्ध पंजाबमधील खरार पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधून शस्त्र आणून पंजाबमध्ये पुरविते
आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या पापला गुज्जर टोळीशी संबंधित आहेत. विक्रम उर्फ पापला हा या टोळीचा कारभार चालवतो. ही टोळी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणते आणि मोहालीमध्ये ती पुरवते.
तस्करीचे रॅकेट कसे चालविले जात ?
सहायक पोलिस अधीक्षक हरसन हंस यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली होती. दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दोन खून, दरोडा, शस्त्रास्त्र कायदा आणि एटीएम फोडण्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी दानवीर हा हरियाणा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या पापला गुज्जर टोळीचा सदस्य आहे. दानवीर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्रे आणतो आणि पंजाबला पुरवतो. 24 ऑक्टोबर रोजी दानवीरने त्याचा साथीदार बंटीबरोबर वाहनातून दोन शस्त्रे आणली. ती शस्त्र तो सिकंदर शेखला देणार होता. जो तो नयागाव नाडा येथील रहिवासी कृष्ण कुमार उर्फ हॅपीला देणार होता. आरोपी दानवीर, बंटी आणि सिकंदर शेख यांना विमानतळ चौकातून डिलिव्हरी करताना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार उर्फ हॅपी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून आणखी तीन पिस्तूल जप्त करण्यात आली.
