Maharashtra Election Vote Percentage
Maharashtra Election Vote PercentageMaharashtra Election Vote Percentage

Maharashtra Election Vote Percentage : महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढला, 11.30 पर्यंत कुठे किती टक्के मतदान जाणून घ्या...

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदारांची उत्स्फूर्त सहभागाची नोंद होत आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंतची अद्ययावत आकडेवारी जाहीर झाली असून अनेक जिल्ह्यांत मतदानाचा वेग चांगलाच वाढताना दिसत आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदारांची उत्स्फूर्त सहभागाची नोंद होत आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंतची अद्ययावत आकडेवारी जाहीर झाली असून अनेक जिल्ह्यांत मतदानाचा वेग चांगलाच वाढताना दिसत आहे. विविध नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.

राज्यात आज सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये किरकोळ तांत्रिक अडचणी आणि मतदार यादीतील गोंधळ उद्भवला असला तरी त्याव्यतिरिक्त बहुतांश मतदान केंद्रांवर शांततेत मतदान होत आहे. आता सकाळच्या मतदानाचा प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यागणिक मतदानाचा चांगला प्रतिसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्याची स्थिती

नाशिकमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत 17.57% मतदानाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर भागात सर्वाधिक 31.55% मतदान झाले, तर सर्वात कमी टक्का येवला येथे 10.46% इतका होता. इगतपुरीमध्ये या वेळेपर्यंत 4801 मतदारांनी मतदान केले असून त्यात 2629 पुरुष आणि 2171 महिला आहेत. त्यामुळे तेथील मतदानाचा टक्का 19.14% झाला आहे.

इतर जिल्ह्यांतील मतदानात वाढ

बुलढाणा : सरासरी 19.79% मतदान

हिंगोली : 11.30 वाजेपर्यंत 22.41% मतदान

गडचिरोली (१२ वाजेपर्यंतचा अहवाल) :

गडचिरोली नगरपरिषद – 23.82%

देसाईगंज – 22.18%

आरमोरी – 21.98%

नंदुरबार आणि नांदेड जिल्ह्यांतील मतदान

नंदुरबारमधील चार नगरपालिकांमध्ये दोन तासांत मिळून 27.29% मतदान झाले.

तळोदा – 8.58%

नंदुरबार – 5.21%

शहादा – 8.09%

नवापूर – 6.41%

नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत सरासरी 19.95% मतदानाची नोंद झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com