Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र बनवायचे?
Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र बनवायचे? काय आहे प्रक्रिया जाणून घ्या....Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र बनवायचे? काय आहे प्रक्रिया जाणून घ्या....

Kunbi Caste Certificate : कुणबी प्रमाणपत्र बनवायचे? काय आहे प्रक्रिया जाणून घ्या....

कुणबी प्रमाणपत्र प्रक्रिया: मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

मनोज जरागेंच्या आंदोलन केले

यामध्ये सरकारने 7 पैंकी 5 मागण्या मान्य केल्या.

ओबीसी सर्टिफिकेट बनवण्यासाठी प्रक्रिया कोणती जाणून घ्या...

Kunbi Caste Certificate: मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगेंनी मुंबईच्या आझाद मैदानावर सलग पाच दिवस उपोषण केले. पाचव्या दिवशी महाराष्ट्राचे शिष्टमंडळांने जरांगेंची भेट घेतली. दरम्यान त्यांच्या 7 पैंकी 5 अटी मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामधील प्रमुख मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी ओबीसी या समाजातून आरक्षण द्यावे. ही मागणी मान्य करण्यात आली. तर मग आता प्रश्न पडतो की, हा फॉर्म किंवा हे सर्टिफिकेट बनवण्याचे कसे, तर आम्ही या बातमीतून तुम्हाला सांगणार आहोत.

जाणून घ्या नेमकी प्रक्रिया कशी ती?

ओबीसी सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला तहसीलदार कार्यालयातील सेतु केंद्रात किंवा आपले सरकार पोर्टल (aaplesarkar.mahaonline.gov.in) वर अर्ज करावा लागेल. यासाठी ओळखपत्र पुरावा, पत्त्याचा पुरावा, वडीलधाऱ्यांचे जात प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि उत्पन्नाचा दाखला यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.

आवश्यक कागदपत्रे:

ओळखीचा पुरावा: मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट.

पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, पासपोर्ट.

वडिलांचे जात प्रमाणपत्र:तुमच्या वडिलांकडे किंवा कुटुंबातील सदस्यांकडे असलेले जात प्रमाणपत्र.

शाळेचा दाखला/ बोनाफाईड: अर्जदाराचा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र.

वंशावळ: अर्जदाराची वंशावळ (वडिलांच्या बाजूने). १९६७ पूर्वीचा जातीचा पुरावा:कुटुंबातील सदस्याचा १९६७ पूर्वीचा जातीचा पुरावा असावा

प्रतिज्ञापत्र (Affidavit): आवश्यक असल्यास, प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.

उत्पन्नाचा दाखला: उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

1. महाराष्ट्र सरकारचे 'आपले सरकार' पोर्टल:

aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

2. सेतु केंद्र: तुम्ही तुमच्या नजीकच्या तहसीलदार कार्यालयातील सेतु केंद्रातही जाऊन अर्ज करू शकता.

प्रमाणपत्र मिळविण्यासाठी साधारणपणे १५ दिवस लागतात.

प्रमाणपत्रासाठी सरकारकडून ठरवलेली शुल्क भरावे लागते, जे साधारणपणे १०० रुपयांच्या आत असते.

ओबीसी प्रमाणपत्रामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षण, सरकारी नोकरी आणि सरकारी योजनांचा लाभ मिळतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com