मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही; पराभवानंतर शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
Admin

मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही; पराभवानंतर शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मोठा विजय मिळवला. तर, महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.

याच पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "40 हजार मते पडणं एक सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार.यात जुन्या पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म काय हे सगळ्यांना माहित आहे, आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com