Raj Thackeray : “महाराष्ट्राने वेगळी झेप घ्यावी, अन्यथा यूपी–बिहारपेक्षा मागे जाईल”, राज ठाकरे यांचा इशारा

Raj Thackeray : “महाराष्ट्राने वेगळी झेप घ्यावी, अन्यथा यूपी–बिहारपेक्षा मागे जाईल”, राज ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. “महाराष्ट्राने आता एक वेगळी आणि ठोस झेप घेणं अत्यंत गरजेचं आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. “महाराष्ट्राने आता एक वेगळी आणि ठोस झेप घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा यूपी आणि बिहारपेक्षाही मागे जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील जनतेने जागरूक राहावे, एवढीच माझी इच्छा आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दळिद्री राजकारण बाजूला ठेवा

त्याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सडेतोड उत्तर दिलं. मला वाटतं की या दळिद्री राजकारणाला बाजूला सारून महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेतली पाहिजे, आजच्या काळाची ती गरजल आहे. नाहीतर ज्या महाराष्ट्राने आत्तापर्यंत देशाला दिशा दाखवली,तोच महाराष्ट्र आता यूपी किंवा बिहारपेक्षाही खाली जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जतनेते आता जागं रहावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

राज ठाकरे यांनी विशेषतः जनतेच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. “फक्त राजकारणी नव्हे, तर सामान्य नागरिकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. प्रश्न विचारले गेले पाहिजेत, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि भविष्यासाठी योग्य दिशा ठरवली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांनीही केवळ नोकरीपुरते न पाहता राज्याच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि स्वाभिमान जपणे महत्त्वाचे असल्याचेही राज ठाकरे यांनी अधोरेखित केले. “माझी फक्त एकच इच्छा आहे की, महाराष्ट्रातील जनता जागी राहावी. आपण जर आजच सावध झालो नाही, तर उद्या उशीर होईल,” असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com