पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत.

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात
Ved Movie Review : प्रेमातील वेडेपण अधोरेखित करणारा चित्रपट

सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे.

उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती, आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती, सर्व मूळ कागदपत्रे, सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच, अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो), आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र ही कागदपत्रे सोबत असणे महत्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com