Lokshahi Update
Lokshahi UpdateTeam Lokshahi

Live Update : यासिन मलिकला जन्मठेप

हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारू, नवनीत राणांना धमकीचा फोन

इम्पेरिकल डाटासाठी केंद्राकडे बोट दाखवायचं नाही तर कुणाकडे बोट दाखवणार..ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून छगन भुजबळ यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

इम्पेरिकल डाटासाठी केंद्राकडे बोट दाखवायचं नाही तर कुणाकडे बोट दाखवणार..ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून छगन भुजबळ यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही - शरद पवार

ओबीसी आरक्षणाला जे लागेल ते आम्ही घेऊ, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही, शरद पवारांची मोठी घोषणा

ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

भाजपकडून ओबीसी मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी पोलिसांकडून मंत्रालयावर जाण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांची धरपकड, भाजप नेते पोलिसांच्या ताब्यात, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, गिरीष महाजनही पोलिसांच्या ताब्यात

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक... खरीप पेरणीसाठी लागणारे बी बियाणे उपल्बध नसल्याने शेतकऱ्यांची लूट...

अमरावती आणि बडनेरा शहरांचा पाणी पुरवठा आज राहणार बंद... मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीसाठी दोन्ही शहरातील पाणी पुरवठा बंद... नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन..

छत्रपती संभाजीराजेंना पक्षात येण्याची अट कशासाठी?.. प्रत्येक गोष्टीत राजकारण केलंच पाहिजे का?... मनसेचे आमदार राजू पाटील यांचा ट्विट करत शिवसेनेला सवाल...

सोयाबीन आणि सनफ्लॉवर तेल होणार स्वस्त.. केंद्राने 2 वर्षांसाठी कस्टम ड्यूटी आणि सेसमध्ये केली घट.. प्रत्येकी 20 लाख टन तेल आयातीलाही परवानगी..

देशात 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी... साखरेच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने निर्यात बंद.. केंद्र सरकारचा मोठा निर्णय..

कपिल सिब्बल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी... राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाकडून भरला अर्ज... समाजवादी अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज..

या सरकारकडून ओबीसींना राजकीय आरक्षण नाही.. यांना 5 वर्ष ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका लढवायच्या आहेत... भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला चिमटा...

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, मोठ्यासंख्येने भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी

ओबीसींना न्याय हे फक्त छगन भुजबळ देऊ शकतात - सुप्रिया सुळे

ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजपकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे, ओबीसींना न्याय हे फक्त छगन भुजबळ देऊ शकतात, राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळ्याव्यात खासदार सुप्रिया सुळेंची टीका

मुंबईत आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीसही हेल्मेटसक्ती

मुंबई पोलिसांनी दिली १५ दिवसांची मुदत, १५ दिवसांनी कारवाई सुरू करणार

अमेरिकेच्या टेक्सासमधील प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार

गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर तरूण ठार...

राज्यात येत्या तीन दिवसात पावसाची शक्यता

काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

केंद्र सरकारचे महागाईविरुद्ध मिशन सुरुच

महागाई रोखण्यासाठी साखर निर्यातीवर निर्बंध...साखरेच्या निर्यातीवर 100 लाख टनाची मर्यादा

शिवसेना नेते यशवंत जाधव इडीच्या रडारवर

यशवंत जाधव यांना चौकशीसाठी इडीचं समन्स....फेमा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीचं समन्स

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवणार

पियुष गोयल यांचं नाव जवळपास निश्चित... दुसऱ्या जागेसाठी विनय सहस्त्रबुद्धे, तर तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांचं नाव चर्चेत...

संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीनं संपला - शिवसेना 

संभाजीराजेंचा विषय आमच्या दृष्टीनं संपल्याचं शिवनसेना खासदार संजय राऊतांचं वक्तव्य... आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार, मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे एवढीच अपेक्षा... संभाजीराजेंच्या समर्थकांनी घडामोडी समजून घ्याव्यात, राऊतांचं संभाजीराजेंच्या समर्थकांना आवाहन...

बैठकींच्या सिलसिल्यानंतर अखेर संभाजीराजेच्या तिकीटाच्या चर्चेला पूर्णविराम... सेनेकडून राज्यसभेचं तिकीट कोल्हापूरचे जिल्हाप्रमूख संजय पवारांना..

भापच्या ओबीसी मोर्चा Live

भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

भाजपच्या ओबीसी मोर्चात समन्वयाचा अभाव

अनेक भाजप कार्यकर्ते मंत्रालयाच्या दिशेने रवाना

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com