MNS
MNS MNS

MNS : मनसेला मोठा धक्का! संदीप धुरीनंतर आणखी एका प्रमुख शिलेदाराचा राज ठाकरेंना रामराम

मनसेला जोगेश्वरीत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे विभाग प्रमुख आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मनसेला जोगेश्वरीत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे विभाग प्रमुख आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला. ढवळेंसोबत वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि उद्योजक ईश्वर रणशूर यांनीही आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरू असताना मनसेमधून मात्र कार्यकर्त्यांची गळती वाढताना दिसते आहे. संदीप ढवळे हे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी युवकांची मजबूत टीम उभी केली होती. त्यांच्या जाण्याने जोगेश्वरी परिसरात मनसेची ताकद कमी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ढवळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला होता आणि पक्षनिष्ठेची भूमिका जाहीर केली होती. मात्र अवघ्या सहा दिवसांत त्यांनी पक्ष बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

थोडक्यात

• मनसेला जोगेश्वरी परिसरात आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
• पक्षाचे विभाग प्रमुख संदीप ढवळे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली.
• संदीप ढवळे हे ‘जय जवान गोविंदा पथकाचे’ प्रशिक्षक म्हणूनही ओळखले जातात.
• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
• खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला.
• या घडामोडीमुळे जोगेश्वरीतील मनसेची संघटनात्मक ताकद कमी झाल्याची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com